नागरी सुविधा, शासकीय कार्यालये आणि शिक्षण !
फुकेरी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक निसर्गरम्य व प्रगतिशील गाव आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली फुकेरी ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्रामस्थांच्या गरजा ओळखून पिण्याचे पाणी, रस्ते, वीजपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम ग्रामपंचायत दक्षतेने करते.
ग्रामपंचायत शिक्षण, शेती, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात विविध उपक्रम राबवते. गावातील शाळा, आरोग्य केंद्र, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, तसेच महिला बचत गट आणि युवक मंडळांच्या माध्यमातून समाजजागृती केली जाते. या कामांमुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढला असून गावाच्या प्रगतीला नवीन गती मिळाली आहे.
लोकसहभाग आणि एकत्रित प्रयत्नांतून मणेरी ग्रामपंचायत आज एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून उभी राहिली आहे. गावात स्वच्छता, शिक्षण आणि हरित उपक्रम यांना प्राधान्य देत ग्रामपंचायत “स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर फुकेरी” घडविण्याचा संकल्प बाळगून सतत कार्यरत आहे
आमचा मार्गदर्शक दृष्टीकोन आणि प्रयत्न
दृष्टीकोन
गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि समावेशक विकास साधण्याचा दृष्टीकोन बाळगते. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी पुरवणारे आदर्श व सुशासित गाव घडवणे.
“स्वच्छ, सुशिक्षित, सक्षम व स्वावलंबी गाव निर्माण करणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.”
मिशन
महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांसाठी विशेष उपक्रम राबवणे.
ग्रामस्थांच्या गरजांवर केंद्रित राहून, सर्व सरकारी योजना पारदर्शकपणे व प्रभावीपणे राबवणे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करणे – जसे की रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व स्वच्छता.
गावातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व पर्यावरणपूरक उपाययोजना अमलात आणणे.
ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून लोकशाही मूल्यांची जोपासना करणे.
गावाची माहिती
व्यवसाय आणि अर्थव्यवस्था
फुकेरी, घारपी आणि उडेली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक सुंदर व शांत गाव आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तीच गावाची आर्थिक कणा आहे. भात, नाचणी, भाजीपाला तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, मिरी या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीबरोबरच गावातील काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय करून उपजीविका करतात. युवक वर्ग आता लघुउद्योग, हस्तकला, पर्यटन व शाश्वत जीवनशैली मार्गदर्शन, होमस्टे आणि वाहन सेवा अशा विविध क्षेत्रात रोजगार निर्माण करत आहे.
संस्कृती आणि इतिहास
दोडामार्ग तालुक्याच्या एका टोकाला डोंगराच्या कुशीत वसलेलं फुकेरी गाव म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार आहे. घनदाट जंगलं, शांत वातावरण आणि पारंपरिक संस्कृती जपणारी गावाची ओळख आजही तितकीच जिवंत आहे. हनुमंत गड, जैवविविध वनराई, धबधबे आणि औषधी वनस्पती हे गावाचं वैभव असून, प्रेमळ आणि आपुलकीची माणसं हेच या गावाचं खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध लोटांगण जत्रांपैकी फुकेरी येथील श्री देवी वैज माऊलीची जत्रा विशेष मानली जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. जत्रोत्सवाच्या रात्री महिला उभ्याने प्रदक्षिणा घालून, तर पुरुष लोटांगण घालून नवस फेडतात. मंदिराचा झगमगाट, भक्तांची गर्दी आणि देवीचं दर्शन यामुळे वातावरण भक्तिमय होतं.
पर्यटन
फुकेरी,घारपी, उडेली हे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध गाव आहे. येथील हनुमंत गड पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. घारपी उडेली गावातील निसर्गरम्य वातावरण, गावाभोवती हिरवाईने नटलेले डोंगर आणि शांत वातावरण आहे. स्थानिक सण, संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैली पर्यटकांना आकर्षित करते.
2000
ग्रूप ग्रामपंचायत फुकेरी
नैसर्गिक समृद्धी आणि आधुनिक विकासाचा ध्यास घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आदर्श गाव घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ईमेल
फोन
fukerigram@gmail.com
+91-9405470953
www.digitalnagri.com © 2026. All rights reserved.
