निसर्गरम्य फुकेरी घारपी उडेली गावात आपले सहर्ष स्वागत आहे
"स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर गाव" सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, हनुमंत गडाचा ऐतिहासिक वारसा जपणारे आणि कृषी-पर्यटनात अग्रेसर असलेले कोकणातील एक आदर्श गाव.
आमच्या गावाची ओळख
फुकेरी घारपी उडेली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक निसर्गरम्य व प्रगतिशील गाव आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शिक्षण, आरोग्य, शाश्वत जीवनशैली , विकास आणि स्वच्छता यांवर भर देत आहोत. येथे ऐतिहासिक हनुमंत गड आणि हिरवाईने नटलेले डोंगर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.
शेती हा आमचा मुख्य कणा असून, भात, काजू, नारळ आणि आंबा बागायतीमुळे गावाला समृद्धी लाभली आहे. 'स्वच्छ, सुशिक्षित आणि स्वावलंबी' गाव निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.


कृषी संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा
एका बाजूला हनुमंत गडाचा ऐतिहासिक पराक्रम, तर दुसरीकडे काजू, नारळ,सुपारी, आंबा आणि भात शेतीची समृद्ध परंपरा. आमचे गाव कृषी-पर्यटन आणि शाश्वत जीवनशैलीचा आदर्श नमुना आहे. निसर्ग आणि विकास यांचा समतोल येथे जपला जातो
पर्यटन आणि ग्रामविकास
फुकेरी घरपी उदेलीतील पर्यटन आणि शाश्वत जीवनशैलीसाठी विविध सेवा


होमस्टे आणि संस्कृती
पर्यकांसाठी पारंपरिक कोकणी घरात राहण्याची उत्तम सोय. स्थानिक सण, खाद्यसंस्कृती आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी आजच भेट द्या.
कृषी पर्यटन
भात, नाचणी आणि काजू-आंबा बागायतींचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. निसर्गाच्या सानिध्यात शाश्वत शेती पद्धती जाणून घ्या.
आमची नैसर्गिक संपदा
फुकेरी घारपी उडेलीच्या निसर्ग, हनुमंत गड आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन.
महत्त्वाची सूचना
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई आहे.
उघड्यावर शौचालय जाणे पूर्णतः बंदी आहे.
ग्रामपंचायत परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये.
ग्रामसभा व ग्रामपंचायत नियमांचे पालन करणे सर्व ग्रामस्थांना आवश्यक आहे
स्थान माहिती
गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठिकाण आहे.
पत्ता
फुकेरी घारपी उडेली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
वेळ
सकाळी ८ ते संध्याकाळी ६
पत्ता
ग्रामीण विकास कार्यालय,फुकेरी घारपी उडेली
वेळ
सकाळी ९ ते संध्याकाळी ५
संपर्क
आपल्या प्रश्नांसाठी आम्हाला येथे संपर्क करा
ग्रूप ग्रामपंचायत फुकेरी
नैसर्गिक समृद्धी आणि आधुनिक विकासाचा ध्यास घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आदर्श गाव घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ईमेल
फोन
fukerigram@gmail.com
+91-9405470953
www.digitalnagri.com © 2026. All rights reserved.
